कल्याण डोंबीवलीत कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या परिसरातल्या कोरोना बाधीतांचा आकाडा ९ हजारांच्या वर गेलाय. या परिसरात क्वारंटाईन सेंटरसाठीचे बेड्स शिल्लक नसल्यामुळे चिंतेची बाब निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीचा समाना करण्यासाठी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी मंगळवारी काही जागांची पाहणी केली. त्यात शिवसेनेच्या एका नगरसेवकाने बैलबाजार वॉर्डातल्या लग्नाच्या हॉलला क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतरीत करण्याची शिफारस केली. हा लग्नाचा हॉल तसाही बंदच असल्यामुळे या ठिकाणी १०० खाटांची व्यवस्था करता येईल, असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. त्यांनी शिवसेना नगरसेवक, आयुक्तालयातल्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या हॉलची पाहणी केली. अशा प्रकारचे उपाय योजले तर एकट्या करल्याण मध्ये २६०० खाटांची सूविधा करता येईल असं ते मह्णतात -
#lokmat #Kalyan #QuarantineCentre #Covid19 #Kalyan
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat